3 died, 20 injured as Guwahati-Bikaner express derails in West Bengal.
पश्चिम बंगालच्या न्यू दोमोहानी रेल्वे स्थानकानजीक गुवाहाटी – बिकानेर ही रेल्वे रुळावरुन घसरली.
पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालच्या न्यू दोमोहानी रेल्वे स्थानकानजीक गुवाहाटी – बिकानेर ही रेल्वे आज सध्यांकाळच्या सुमारास रुळावरुन घसरली. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यु झाला असून २० प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर तत्काळ वैद्यकीय वाहन आणि रेल्वे राहत यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्षही दिल्लीहून घटनास्थळी रवाना झाले. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मदत आणि बचावकार्य जवळपास पूर्ण झाले असून घटनास्थळी ३५ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या वारसांना ५ लाख, गंभीर जखमी झालेल्यांना १ लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घटनेबाबतची माहिती घेतली असून मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी झालेले लवकरात लवकर बरे होतील अशी आशाही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.