Large bridge over Indrayani river closed for heavy vehicles.
इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहनांसाठी बंद.
पुणे : पुणे शहर हद्दीतील आळंदी-मरकळ, तुळापुर-फुलगाव, लोणीकंद- थेऊर- लोणीकाळभोर – वडकी – उंड्री कात्रज मार्गावरील तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल धोकादायक झाला असल्याने अत्यावश्यक सेवेतील वाहनाशिवाय (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी.) जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग म्हणुन शिक्रापूर ते चाकण किंवा विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उप-आयुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
विमानतळ वाहतूक विभागांतर्गत नो-पार्किंगचे आदेश.
विमानतळ वाहतूक विभागांतर्गत सुंदराबाई मराठे शाळेच्या संरक्षण भिंतीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बाहेरील बाजूस तसेच आनंद कार्नर सोसायटीच्या प्रवेशद्वार क्रमांक 1 ते आनंद पार्क सोसायटीच्या प्रवेशद्वारापासून 15 मीटर अंतरापर्यत रोडच्या दोन्ही बाजुला अत्यावश्यक सेवेतील वाहना (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी) शिवाय अन्य वाहनांसाठी नो-पार्किंगचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना याबाबत काही सुचना असल्यास त्यांनी पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा कचेरी कार्यालयाजवळ, पुणे-6 येथे 10 ते 24 जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन पोलीस उप-आयुक्त श्रीरामे यांनी केले आहे.