Counselling for the ‘NEET’ exam will start from the 19th of this month.
नीट परीक्षेसाठीचं समुपदेशन या महिन्याच्या १९ तारखेपासून सुरू होईल.
नवी दिल्ली : नीट परीक्षेसाठीचं समुपदेशन या महिन्याच्या १९ तारखेपासून सुरू होईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल जाहीर केलं. वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीत संस्थांद्वारे जागांची पडताळणी १७ आणि १८ जानेवारीला होईल.
नोंदणी तसंच शुल्क भरणे या प्रक्रियांसाठी १९ ते २४ जानेवारी असे ६ दिवस असतील. विद्यार्थ्यांना आपापली निवड भरण्यासाठी २० ते २४ जानेवारी या ५ दिवसांची मुदत असेल. इतर फेऱ्या तसंच प्रक्रियांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.