पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनसह कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते,

A fully vaccinated person has a lesser chance to get infected with Covid including omicron: Health Ministry.

पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनसह कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते: आरोग्य मंत्रालय.Health and Family Welfare Ministry

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की पूर्णपणे लसीकरण केलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनसह कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता कमी असते. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, पुरावे स्पष्टपणे सूचित करतात की पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल होण्याची आणि गंभीर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

श्री अग्रवाल म्हणाले की, सरकार कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.

त्यांनी आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले ज्यांनी दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. लसीकरणासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *