कोरोनाच्या फसव्या आणि समाज माध्यमांमधून पसरविल्या जाणाऱ्या उपायांपासून दूर राहा.

Stay away from corona frauds and social media propaganda – Love Agarwal.

कोरोनाच्या फसव्या आणि समाज माध्यमांमधून पसरविल्या जाणाऱ्या उपायांपासून दूर राहा – लव अग्रवाल.Stay away from corona frauds and social media propaganda - Lav Agarwal.

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांनी फसवे आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित नसलेले उपचार घेऊ नयेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी  दिलेल्या विशेष मुलाखतीत याबाबत नागरिकांना सावध केलं आहे.

विविध समाज माध्यमांवर कोविडच्या उपचारांविषयी सांगितले जाणारे उपाय आणि माहितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण तयार होतं, अशा गोष्टींना कोणीही बळी पडू नये, असं ते म्हणाले.

रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच रक्त तपासणी, एक्स-रे, एमआरआय आणि सीटी स्कॅन करावं, कोविड-19 च्या सौम्य आणि लक्षणं नसलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स देऊ नयेत यावर त्यांनी भर दिला. प्रत्येक रुग्णासाठी कोविड-19 चा उपचार वेगळा असतो तसंच उपचारांदरम्यान स्टेरॉइड्सचा वापर टाळला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉइड्सचा वापर केल्यास म्युकर मायकोसिस सारखा संसर्ग होण्याची शक्यता असते असं त्यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *