The Under-19 Cricket World Cup kicks off in the West Indies today.
१९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून वेस्ट इंडीज मध्ये प्रारंभ.
१९ वर्षाखालील १४ व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून वेस्ट इंडीज मध्ये प्रारंभ होत आहे.
येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत अँटिग्वा- बार्बुडा, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट किट्स आणि नेव्हिस तसंच गयाना या देशांमध्ये १० ठिकाणी हे सामने खेळले जातील. वेस्ट इंडीज पहिल्यांदाच या विश्वचषकासाठी यजमानपद भूषवत आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला यजमान वेस्ट इंडीजचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार असून उद्या श्रीलंकेचा सामना स्कॉटलंडशी गयाना इथं होईल. भारत उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्पर्धेतला आपला पहिला सामना खेळेल.
या स्पर्धेत 16 संघांदरम्यान 48 सामने होणार आहेत. 1 आणि 2 फेब्रुवारी ला उपांत्य फेरी तर 5 फेब्रुवारी ला अंतिम सामना होईल.
दरम्यान, स्पर्धा शक्य तितकी सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जैव सुरक्षेची रूपरेषा आखली आहे. या स्पर्धेशी संबंधित सर्वांचं आरोग्य आणि सुरक्षितता आय सी सी च्या प्राधान्यक्रमावर आहे. यासाठी आयसीसी नं सहभागी सदस्य आणि यजमान देशांच्या सरकारांच्या सहकार्यानं जैव सुरक्षा वैज्ञानिक सल्लागार गटाची स्थापना केली आहे.