Kashiram Chinchay, the singer of folk and traditional Koli songs, dies.
लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी गीतांचे गायक काशीराम चिंचय यांचं निधन.
मुंबई: सुप्रसिद्ध लोकशाहीर आणि पारंपारिक कोळी गीतांचे बादशहा शाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचं आज मुंबईत निधन झालं . ते ७१ वर्षांचे होते.
शाहीर काशिराम चिंचय यांनी गेली पाच दशकं आगरी-कोळी पारंपरिक गाण्यांचा ठेका सातासमुद्रापार नेला. जात, धर्म, प्रांत या सीमांच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्माण केलेल्या कोळी गीतांच्या संगीताच्या ठेक्यावर सगळ्यांना नाचायला लावलं.
वेसावकर आणि मंडळी या सुप्रसिद्ध कलापथकाची निर्मिती असलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या लोकनाट्यातले त्यांचे संवाद आजही कोळी समाजाच्या संस्कृतीचं चित्रण करतात.