Settle on the result of 10th (SSC). The formula ready.

Settle on the result of 10th (SSC). The formula ready.

Fifty percent marks for internal evaluation.           

Maharashtra SSC & HSC Board
Maharashtra SSC & HSC Board

The state government is planning to implement the formula for passing the 10th standard students. The Department of School Education considered the assessment method to be adopted for passing the students of class X(SSC), and the policy was formulated accordingly. This was announced by School Education Minister Varsha Gaikwad. A written outline of the results has also been issued. Discussions were held through 24 different meetings with experts, principals, teachers, people’s representatives, parents’ associations, technology companies in the department while formulating a comprehensive outcome policy in the unusual situation caused by Corona. After considering all the factors, after in-depth discussions with all the constituents, a policy was decided regarding the awarding of Class X students. According to these assessment policies, students will be assessed 100 marks in each subject.

The Formula.

 While formulating the policy, the results of class X and its statistics have been reviewed.  The last few years and the percentage of students who have passed eighth and ninth standard has been taken into account by the school education department. As the situation of schools in other boards is different, 50% marks will be given to the 10th standard students for internal assessment. While the remaining marks will be given at the school and board level. In addition, these marks will be given on the basis of school practicals, online, offline learning, and marks obtained in the previous year. Education department officials said that some criteria have been set for this.

 According to this, it has been decided to give 50% marks in the subject-wise results of the final examinations of class IX at the school and board level and 50% marks for internal assessment in class X. Thus, the final result of 10th standard has been decided. All the students will be passed on the basis of internal assessment. 100 marks will be assessed for each subject. The results will be announced by the end of June.

Opportunity available again, if results are unsatisfactory

 If the students find the result prepared by the internal assessment method unsatisfactory, they will be given an opportunity to appear in the next two consecutive examinations through the grade improvement scheme as per the prevailing rules of the board once the corona condition becomes normal.

The government had decided to cancel the 10th exam due to Corona. The state government will submit the details of this policy to the Mumbai High Court through an affidavit. The main reason for the cancellation of the 10th examination is the situation in Covid, which is mainly created in the state. The affidavit also said that the Central Government had canceled the CBSE and its subsequent matriculation examinations on the basis of the state’s Disaster Management Act and it was not possible to retake the examinations offline.

 A  committee of 7-members will have to be set up at the school level under the chairmanship of the headmaster to regulate the results of the students. The records of this result will be verified at the departmental level by the officer of the school education department. Discipline and punitive action are provided in case of misconduct at the school level. The state board will have to plan to announce the results by the end of June. For this, the schedule for completing the student evaluation process will be announced by the board soon. All schools will have to comply with this.

Prepared a plan for the re-examine.

The procedure of assessment has been fixed for the re-examining. In this, 80 marks for the average of the marks obtained in the written examination in the subjects passed in the previous examinations of the State Board and 20 marks for the internal child in the final oral and practical examination of class X have been decided.

Procedures also developed for private students.

Procedures are also set for private students. In this, the marks obtained for one or more of the completed exercise books, homework, projects completed by the contact center will be converted into 80 marks out of 80 subject-wise. According to the working procedure of the board, Anima will be given out of 20 marks for oral examination in oral and practical examination.

The revaluation facility will not be available for the examination.

As the results will be prepared by the schools through the various assessment processes, the answer sheets of the first session examination, all examinations, other assessment examinations considered for internal assessment will be shown to the students or given at home. This is also mentioned in the ruling. On the basis of the result, marks and certificates will be given by the State Board.

दहावीच्या निकालावर काढला तोडगा,  फॉर्म्युला केला तयार. 

अंतर्गत मूल्यमापनासाठी पन्नास टक्के गुण .

Maharashtra SSC & HSC Board
Maharashtra SSC & HSC Board

दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी अमलात आणण्याच्या सूत्राचे राज्य सरकारने नियोजन केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी कोणत्या मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला जाईल याचा विचार शालेय शिक्षण विभागाने केला, आणि तसे धोरण तयार करण्यात आले.  हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. निकालांचा लेखी आराखडाही शासन निर्णयाच्या द्वारा जारी झाला आहे. कोरोनामुळे उध्दभवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे निकालाचे धोरण तयार करतांना विभागातील  तज्ञ , मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी 24 विविध  बैठका द्वारे  चर्चा करण्यात आली.  सर्व बाबींचा विचार करून, सर्व घटकांशी  सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थयांना गुणदान करण्याबाबत धोरण निश्चित केले. या मूल्यमापन धोरणांनुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १००  मूल्यमापन करण्यात येईल . 

 धोरण ठरविताना मागील  काही वर्षातील दहावीच्या निकालाची आणि त्याच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला असून त्यासोबतच आठवी, नववी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी याची माहिती घेऊन शालेय शिक्षण विभागाने त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करण्याचा या धोरणात समावेश केला.  इतर मंडळांच्या राज्यांची शाळांची परिस्थिती ही वेगळी असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण विद्यार्थ्याला करताना अंतर्गत मूल्यमापनासाठी 50 टक्के गुण दिले जाणार असून इतर उर्वरित गुण  शाळा आणि शिक्षण मंडळाच्या स्तरावर देण्याचे नियोजन केले जाणार आहे.  शिवाय शाळेतील प्रात्यक्षिक, ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण आणि मागील वर्षात प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारावर हे गुण दिले जातील.  यासाठी काही निकष ठरवण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली . 

 या नुसार इयत्ता नववीच्या अंतिम परीक्षांच्या  विषयनिहाय  निकालातील 50 टक्के  गुण  शाळा आणि शिक्षण मंडळाच्या स्तरावर देण्याचे ठरविण्यात आले आहे व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनासाठी 50 टक्के गुण.  याप्रमाणे 10 वी चा अंतिम निकाल लावण्याचे  सूत्र निश्चित झाले आहे .सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण  करण्यात येणार आहे.  प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचे मूल्यमापन होणार आहे. जून अखेरपर्यंत निकाल जाहीर करणार आहे.

निकाल असमाधानकारक वाटल्यास परत संधी उपलब्ध. 

 विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला निकाल असमाधानकारक वाटत असेल तर त्यांना कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यावर मंडळाच्या प्रचलित नियमानुसार श्रेणीसुधार योजनेद्वारे पुढील लगतच्या दोन परीक्षा मध्ये प्रविष्ट होण्याची संधी  उपलब्ध करून देण्यात येणार आहे

कोरोना मुळे दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय  शासनाने घेतला होता.   या धोरणाची माहिती राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र च्या माध्यमातून सादर करणार आहे.  दहावी परीक्षा रद्द करण्यासाठी प्रामुख्याने राज्यात निर्माण झालेली कोविडची  परिस्थिती  हे प्रमुख  कारण या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.  तसेच केंद्र सरकारने सीबीएससी (CBSE ) आणि त्यानंतर इतर मंडळांनी आपल्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून त्याच  पार्श्वभूमीवर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत या परीक्षा रद्द केल्या  असून या परीक्षा  पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेणे शक्य नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. 

 विद्यार्थ्यांना निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती स्थापन करावी लागणार आहे. या निकालपत्राच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार झाला तर शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. राज्य मंडळामार्फत जूनअखेर निकाल जाहीर करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे वेळापत्रक मंडळातर्फे लवकर जाहीर केले जाईल. सर्व शाळांना याचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे . 

 

पुनर्परीक्षार्थीसाठी आराखडा तयार. 

पुनर्परीक्षार्थीसाठी मूल्यमापनाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यात राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या  परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांमध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या सरासरी साठी ८० गुण व दहावीचे अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेतील अंतर्गत मुलासाठी २० गुण  असे निकष ठरविले आहेत . 

खासगी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कार्यपद्धती  तयार. 

खासगी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कार्यपद्धती ठरविले आहे. यात संपर्क केंद्रामार्फत आयोजित सर्व चाचण्या पूर्ण केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबीसाठी प्राप्त झालेल्या गुणांचे विषयनिहाय ८० पैकी गुणात रूपांतर करण्यात येणार आहे . मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अनिमा तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मुलायमापनासाठी २० पैकी गुण देत्याना ण्यात येणार आहे. 

पुनर्मूल्यांकन या सुविधा परीक्षेसाठी उपलब्ध नसणार. 

शाळांकडून विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे निकाल तयार करण्यात येणार असल्याने अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा सर्व परीक्षा अन्य मूल्यमापन परीक्षांच्या उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या किंवा घरी  दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती मिळवणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसतील, असेही  शासन निर्णयात नमूद केले आहे . निकालाच्या आधारे राज्यमंडळाकडून गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *