Army Chief says incidents of violence come down significantly due to continuous efforts of security forces.
सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे सीमाभागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट – सेनादल प्रमुख जनरल मनोज नरवणे.
नवी दिल्ली: सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं सेनादल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सैन्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या वर्षभरात १९४ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती त्यांनी दिली. सीमाभागात सध्या परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असली तरी सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत, असं ते म्हणाले. सुमारे ३०० ते ४०० दहशतवादी देशात घुसखोरी करण्याकरता सीमेवर दबा धरून असल्याचं नरवणे यांनी सांगितलं.