देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

Health Ministry says over 156 crores 90 lakh Covid vaccine doses administered so far in the country.

देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या.Over 156 crores 90 lakh Covid vaccine doses administered so far in the country.

नवी दिल्ली : भारताने आज कोविड-19 विरुद्ध लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताची लसीकरण मोहीम ही आतापर्यंतची सर्वात जलद आणि सर्वात यशस्वी लसीकरण मोहीम आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. तर, ४२ लाख २१ हजारपेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. आज सकाळपासून सुमारे १४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.

राज्यात आज सकाळपासून २५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालय. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे १४ कोटी ३१ लाख झाली आहे. यात ५ कोटी ८० लाख ४३ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. तर, ३ लाख २२ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे.
गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण सात हजार ७४३ ओमिक्रॉन प्रकरणे आढळून आली आहेत, जी कालपासून २८.१७ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 24 तासांत 318 जणांचा मृत्यू झाला आहे. दैनिक सकारात्मकता दर 16.28 टक्के आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 13.69 टक्के आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *