With the demise of Radhakrishna Narvekar, a militant journalist and active editor was lost.
-Tribute to Deputy Chief Minister Ajit Pawar.
After the demise of veteran journalist Radhakrishna Narvekar, a farmer, a hard-working brother, a sympathizer of the common man, a militant journalist who has been constantly fighting for the rights of the mill workers, an active editor has passed away. With his demise, a chapter of Marathi journalism has come to an end, said Deputy Chief Minister Ajit Pawar.
Paying homage to veteran journalist Radhakrishna Narvekar, Deputy Chief Minister Ajit Pawar said that Radhakrishna Narvekar has contributed to Marathi journalism for more than half a century. In his long career in journalism, he successfully handled the responsibilities of many Marathi newsgroups. However, he had a different relationship with Dainik Mumbai Sakal. He was the editor of Dainik Mumbai Sakal for a long time. That was their identity. The problem of Mumbai and the mill workers in Mumbai was the subject of his study and intimacy. He was a fearless, impartial, independent journalist. Many generations of journalists formed under his guidance are today contributing through various mediums. The demise of Radhakrishna Narvekar is a great loss to Marathi journalism, Marathi literature, and social movements in Maharashtra. I pay my heartfelt tributes to him, said Deputy Chief Minister Ajit Pawar.
राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनाने लढाऊ पत्रकार, कृतीशील संपादक हरपला.
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली.
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या व्यथांशी समरस झालेला, गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा लढाऊ पत्रकार, कृतीशील संपादक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राधाकृष्ण नार्वेकर यांनी अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिले. पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी वृत्त समूहाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. दैनिक मुंबई सकाळशी मात्र त्यांचे वेगळे नाते होते. दैनिक मुंबई सकाळचे संपादक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळली. तीच त्यांची ओळख होती. मुंबईच्या आणि मुंबईतील गिरणी कामगारांच्या समस्या हा त्यांचा अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा विषय होता. निर्भीड, निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पत्रकारांच्या अनेक पिढ्या आज विविध माध्यमातून आपले योगदान देत आहेत. राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन मराठी पत्रकारिता, मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचे मोठे नुकसान आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.