राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील – राजेश टोपे.

The health department strives to speed up vaccination in the state – Rajesh Tope.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील – राजेश टोपे.State Health Minister Rajesh Tope

जालना : राज्यात कोरोना बाधितांची संख्या मोठी असली तरी मृत्यूदर खूप कमी असून, हा लसीकरणाचा चांगला परिणाम असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना इथं सांगितलं. महाराष्ट्र लसीकरणात देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाल्याच्या निमिताने टोपे बोलत होते. या मोहिमेअंतर्गत सध्या १५ ते १८ या वयोगटातील मुलामुलींच लसीकरण प्राधान्यक्रमाने करण्यात येत असून, दररोज या वयोगटातील ८ लाख जणांच लसीकरण होत आहे; असं ते म्हणाले.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम करत असल्याचं टोपे यांनी सांगितलं. मला असं वाटतं की लसीकरणाच्या बाबतीत आज एक वर्ष पूर्ण झालं असताना मी पुन्हा एवढच अधोरेखित करेन की लस घेतल्याने तुम्ही दवाखान्यात जाणार नाहीत.

तुम्ही आयसीयू व्हेंटिलेटर ऑक्सिजन तुम्हाला लागणार नाही. ही खात्रीदायक परिस्थिती जगभरातील अभ्यासाच्या अंती आहेच. आणि त्यामुळे लसी चे महत्व आम्ही सर्व दूर सर्व लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

ऐच्छिक लसीकरण असल्यामुळे आणि मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी लसीकरण नसल्यामुळे हा जो काही दहा-पंधरा टक्के किंवा आठ दहा टक्क्यांचा जो काही आता गॅप राहिला आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी थोडी गती मंदावलेली आहे.

परंतु आम्ही मिशन मोड वर आहोत. मिशन मोड चा अर्थ जोपर्यंत आपलं लसीकरण १००% राज्याचं होत नाही तोपर्यंत आरोग्य विभाग स्वस्थ बसणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *