एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचा कामगार न्यायालयाचा निर्वाळा.

The strike was declared illegal by the ST workers.

एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचा कामगार न्यायालयाचा निर्वाळा.Maharashtra State Road Transport Corporation

मुंबई : एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर असल्याचं कामगार न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आज याबाबत न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस, श्रीरंग बरगे  यांनी ही माहिती दिली. एसटी प्रशासनानंही याला दुजोरा दिला आहे. या निकालानुसार आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्याची परवानगी एसटी प्रशासनाला मिळणार आहे.

संपकरी कर्मचार्‍यांविरुद्ध आतापर्यंत एसटी प्रशासनानं केलेल्या सर्व कारवाया वैध ठरणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं.  अद्याप न्यायालयाच्याा निकालाची प्रत मिळाली नसल्यानं त्या बाबत बाेलता येणार नाही. मात्र एसटी कामगारांचा हा संप न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे, असं ते म्हणाले.

एसटी प्रशासनानं कालपर्यंत ३  हजार ५८८ संपंकरी कर्माचाऱ्यांना बडतर्फ केलं असून, ५ हजार ७८२ कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यातल्या २५० एसटी आगारांपैकी २२६ एसटी आगार अंशतः सुरु असून, आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एसटी गाड्यांच्या ५ हजार ८८२, म्हणजे अंदाजे ४० टक्के फेऱ्या झाल्याचं एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं सांगितलं.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *