राज्यातल्या नगर पंचायती, ग्रामपंचायतींच्या उर्वरित जागांसाठी उद्या मतदान.

Polling tomorrow for the remaining seats of Nagar Panchayats and Gram Panchayats in the state.

राज्यातल्या नगर पंचायती, ग्रामपंचायतींच्या उर्वरित जागांसाठी उद्या मतदान.Nanded-By-Elections

मुंबई : राज्यातल्या ग्रामपंचायती, नगर पंचायत, भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीतल्या उर्वरित जागांवर उद्या मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी प्रवर्गातल्या या जागा अनारक्षित करुन मतदान घेण्यात येतं आहे.

राज्यातल्या ९५ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्या,  सुमारे साडे 4 हजार ग्रामपंचायती आणि सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका पोटनिवडणुकीच्या जागेचा यात समावेश आहे.  भंडारा जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समितीच्या २५ गणाकरता उद्या मतदान होणार आहे. दुस-या टप्यातल्या या मतदानासाठी 3 लाख 67 हजार मतदार  मतदानाचा हक्क बजावणार  आहेत.

या निवडणुकांसाठी  संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी  जाहीर करण्यात आली आहे. उद्या मतदान होणाऱ्या जागा आणि गेल्या महिन्यात २१ तारखेला मतदान झालेल्या जागांची एकत्र मतमोजणी बुधवारी होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीतल्या ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित करुन त्यानुसार निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारने दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *