इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पुढे.

India Post Payments Bank’s customer base crosses 5 Crore Mark.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची ग्राहकसंख्या पाच कोटींच्या पुढे.

देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणाऱ्या डिजिटल पेमेंट बँकेपैकी एक बँक ठरली.

ग्रामीण, बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांची, त्यांना आवश्यक असलेली उत्पादने आणि सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध.India Post Payment Bank

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ करतांना म्हटले होते, की देशात वित्तीय समावेशन करण्यासाठीचा हा सर्वात मोठा उपक्रम आहे.त्या पोस्ट पेमेंट बँक या प्रथम डिजिटल बँकेने दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा उत्तम वापर करत त्या पायावर आपला विस्तार करत, एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींवर  पोहोचली  आहे, अशी घोषणा आज बँकेने केली. बँकेचा शुभारंभ झाल्यापासून, केवळ तीन वर्षांच्या आत ही देशातील सर्वाधिक जलद गतीने विस्तारलेल्या बँकांपैकी एक बँक ठरली आहे.

आयपीपीबीने आपल्या 1.36 लाख पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून पाच कोटी खाती डिजिटल आणि संपूर्ण कागदरहित व्यवहार करत सुरु केली आहेत. यापैकी 1.20 लाख खाती ग्रामीण भागातली आहेत. तसेच, 1.47 लाख ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत.

या कामगिरीमुळे, आयपीपीबीने जगातील सर्वात मोठी डिजिटल वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असून, टपाल कार्यालयाच्या  2,80,000  कर्मचाऱ्यांच्या परिश्रम शक्तीच्या बळावर, वित्तीय साक्षरता आणि सक्षमीकरणाची मोहीम राबवली आहे.

विशेष म्हणजे, बँकेच्या एकूण खातेदारांपैकी सुमारे 48% महिला खातेदार आहेत, तर 52% पुरुष खातेदार आहेत, ही आकडेवारी, अधिकाधिक महिलांना बँकिंग क्षेत्रात आणण्याचा बँकेचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. महिलांच्या एकूण खात्यांपैकी 98% खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली आहेत. आणि 68% महिलांना या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत. आणखी एक मैलाचा दगड  म्हणजे देशातील युवक देखील पोस्ट पेमेंट बँकेकडे आकर्षित झाले आहेत. 41% पेक्षा अधिक खातेधारक 18 ते 35 वर्षे या वयोगटातील आहेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *