देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सहकार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन.

Shri Nitin Gadkari calls for cooperation between Central and State Governments for the infrastructure development of the country.

देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सहकार्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन.Shri Nitin Gadkari calls for cooperation between Central and State Governments

नवी दिल्ली : देशामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्वाची भूमिका बजावणार आहे, असे ते म्हणाले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने दक्षिण विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘‘पीएम- गती शक्ती’’ परिषदेचे उद्घाटन करताना गडकरी म्हणाले, राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये सहकार्य आणि संवाद वाढविण्याची गरज आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यांकडून आलेल्या सूचनांचे त्यांनी स्वागत केले.

भारत सरकार आणि राज्ये यांच्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसाठी सहकार्य आणि समन्वय साधण्याची गरज आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांनी आपल्या भाषणात निदर्शनास आणून दिले. जास्तीत जास्त गुंतवणूक केली जावी, यासाठी केंद्राने प्रकल्पांच्या मंजुरीची प्रक्रिया वेगाने करून आर्थिक विषयक नियम शिथील करावेत, असे आवाहन  त्यांनी केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे सचिव गिरीधर अरमाने यांनी कार्यक्रमामध्ये स्वागतपर भाषण केले. त्यांनी राज्य पातळीवर संस्थात्मक चौकट निर्माण करण्यावर भर दिला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मास्टर प्लॅनसाठी पथ दर्शक कार्यक्रम विकसित करण्याबरोबरच  केंद्रीय मंत्रालये आणि सर्व राज्य सरकारांच्या अधिका-यांनी  प्रकल्पाविषयी अधिक संवेदनशील राहून त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणे, हा या परिषदेचा उद्देश असल्याचे यावेळी सांगितले.

या परिषदेमध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षव्दीप, महाराष्ट्र, पुडुचेरी, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *