Extension till 31/1/2022 for filling up the application for free online coaching for competitive exam sponsored by Sarathi, Pune.
सारथी, पुणे मार्फत प्रायोजित स्पर्धा परिक्षेसाठी निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज भरण्यास दिनांक ३१/१/२०२२ पर्यंत मुदतवाढ.
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी), पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज भरण्यास दिनांक३१/१/२०२२ पर्यंत मुदतवाढ. Staff Selection Commission मार्फत आयोजित ा (Combined Graduate Level, Combined Higher Secondary Level, Junior Engineers, CAPF, Multi Tasking Non Technical Staff) स्पर्धा परिक्षेसाठी महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवाराांना सारथी, पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज मागविण्यात आलेआहेत.
काही अर्जदार विद्यार्थ्यांना महत्त्वाचे दाखले मिळण्याकरिता तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता अवधी लागत असल्याकारणाने सदर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणेकरीता मुदतवाढ मिळण्याकरीता विनंती केली आहे.
त्यामुळेअधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी, Staff Selection Commission मार्फत आयोजित (अराजपत्रित) परिक्षा प्रशिक्षण या उपक्रम करिता दिनांक ३१/१/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती व ऑनलाईन फी भरण्यासाठी आवश्यक निकष , अटी शतीशर्ती सारथी, पुणेच्या संकेत स्थळावरील लिंक पहा : www.sarthi-maharashtragov.in > सूचना फलक > Staff Selection Commission Non Gazetted Posts Examination Coaching 2021 > Candidate Online Application Form > पहावी.
श्री अशोक काकडे भा.प्र.से.
र्व्यवस्थापकीय संचालक,सारथी, पुणे