Over 50 percent of children between the 15 to 18 age group receive 1st dose of the COVID-19 vaccine in the country.
देशातल्या १५ ते १८ वयोगटातल्या निम्म्याहून पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा.
नवी दिल्ली: १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रत्येकानं लसीकरण करून घेणं आणि कोविड संबंधित नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे, असं सांगून संपूर्ण देश एकत्रितपणे या संकटाचा सामना करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या वयोगटातल्या ५० टक्के मुलांचं लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच लसीकरणाची गती कायम राखण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“तरुण आणि युवा भारत आपल्याला मार्ग दाखवीत आहे!
ही अत्यंत उत्साहवर्धक बातमी आहे. आपण लसीकरणाचा हाच वेग कायम ठेवूया.
लसीकरण करून घेणे आणि कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्व एकत्रितपणे या महामारीशी लढा देऊया.”