Autorickshaw meter inspection is not working from 22nd to 24th January.
२२ ते २४ जानेवारीदरम्यान ऑटोरिक्शा मीटर तपासणीचे कामकाज नाही.
पुणे : मोटार वाहन विभागातील सेवाप्रवेशोत्तर व सेवाअर्हता परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या असल्याने या कालावधीत ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज होणार नसल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
परीवहन विभागाचा बहुतांश कार्यकारी अधिकारीवर्ग परीक्षार्थी म्हणून या परीक्षेमध्ये सहभागी होणार असून उर्वरित कार्यकारी अधिकारी हे परीक्षा प्रक्रिया राबविण्याच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. यामुळे ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज होऊ शकणार नाही.
ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण (मीटर कॅलिब्रेशन) करण्याकरीता ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ऑटोरिक्षांचे मीटर पुन: प्रमाणीकरण विहित कालमर्यादेत व सुरळीतपणे पूर्ण होण्याकरिता कर्वेनगर येथील अलंकार पोलीस स्टेशनसमोर, पिंपरी-चिंचवड येथील फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, दिवे (पासिंग वाहने) आणि खराडी येथील इऑन आयटी पार्कजवळ दररोज मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येते असेही कळवण्यात आले आहे.