Online guidance on January 21 on opportunities in the film industry.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रम
चित्रपट उद्योगातील संधीबाबत 21 जानेवारीला ऑनलाईन मार्गदर्शन.
पुणे दि. १९: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राज्यातील युवक-युवतींना ‘चित्रपट उद्योगातील करिअर’ याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व व्यवसायाबाबत मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्यावतीने शुक्रवार २१ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजता करण्यात आले आहे.
कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, नवीमुंबई यांच्यामार्फत ‘चला उद्योजक होऊया!’ या नाविन्यपूर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारी दुपारी ३ ते ४.३० वाजेपर्यंत फेसबुक पेज व युट्यूब वरून थेट विनामूल्य ऑनलाईन उद्योजकता मार्गदर्शन वेबिनार शृंखला सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
या शृंखलेअंतर्गत ‘चित्रपट उद्योगातील करिअर’ हा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या https://www.facebook.com/maharashtraSDEED या फेसबुक पेजवरून व https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A या युट्यूब चॅनेलद्वारे थेट लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माते व तज्ज्ञ मार्गदर्शक ज्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे सहयोगी प्राध्यापक आणि माजी संचालक डॉ. मंगेश बनसोडे, पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेते मनोज जोशी, प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील जोशी, चित्रपट निर्माता संदीप घुगे हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना उद्योग यशस्वीपणे करण्यासाठी ‘चित्रपट उद्योगातील करिअर’ या विषयाचा सविस्तर परिचय, भविष्यातील संधी आदींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी उमेदवारांना फेसबूक पेजवर व युट्यूब वर कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारता येतील. याची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येतील. विभागाचे फेसबुक व युट्यूब पेजला लाईक व फॉलो करुन या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हावे. काही तांत्रिक आदी अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ अथवा punerojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्रीमती पवार यांनी केले आहे.