SEBI launches Saa₹thi mobile app on investor education, which will be helpful in accessing recent market developments.
सेबीने गुंतवणूकदारांच्या शिक्षणासाठी सारथी Saa₹thi हे मोबाईल अँप केले सुरू.
मुंबई: भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीनं (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) )ने ने गुंतवणूकदारांच्या योग्य प्रशिक्षणसाठी सारथी Saa₹thi हे मोबाईल अँप सुरू केले आहे.
गुंतवणूकदारांना रोखे बाजाराबद्दल अचूक ज्ञान देऊन सक्षम बनवणं हे या नवीन अँपचं उद्दिष्ट आहे. या अँपची नवोदित वैयक्तिक गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात मदत होईल असं सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी मुंबईत या अँपचं उद्घाटन करताना म्हणाले. यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक प्रकारची माहिती मिळेल.
मुंबईतील लॉन्च इव्हेंटला संबोधित करताना, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले, अँप मोठ्या प्रमाणात वैयक्तिक गुंतवणूकदारांना मदत करेल, ज्यांनी अलीकडेच बाजारात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या मोबाइल फोनद्वारे व्यापार करतात त्यांना हे अँप उपयोगी होईल.
आगामी काळात हे अँप तरुण गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होईल, अशी आशा व्यक्त करून श्री. त्यागी म्हणाले, सिक्युरिटीज मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड यासारख्या सर्व संबंधित माहिती, बाजारातील चढ-उतारांची माहिती ,बाजारातील अलीकडील घडामोडी, गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा इ. सहज उपलब्ध होण्यासाठी अँप उपयुक्त ठरेल.
हे सध्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. अँपच्या Android आणि iOS आवृत्त्या अनुक्रमे प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवरून डाउनलोड केल्या जाऊ शकतात.