कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६० कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला.

COVID 19 Preventive Vaccination Campaign Crosses 160 Crore Vaccines.

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६० कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला.COVID 19 Preventive Vaccination Campaign Crosses 160 Crore Vaccines

नवी दिल्ली: कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज १६० कोटी लस मात्रांचा टप्पा पार केला. आत्तापर्यंत देशभरात १६० कोटी ६ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत.

यापैकी ६७ कोटी १८ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा, तर ६३ लाख ९२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे.

१५ ते १७ या वयोगटात आत्तापर्यंत ३ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. आजच्या दिवशी सकाळपासून देशभरात ३९ लाखाहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं.

यात १५ ते १७ वयोगटातल्या ६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली, तर ४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे.

राज्यातही आजच्या दिवशी सकाळपासून २ लाख ८५ लाखाहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आत्तापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी ५० लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ५ कोटी ९१ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची दुसरी, ४ लाख ९५ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लसीची वर्धक, तर १५ ते १७ या वयोगटातल्या २८ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *