देशाच्या प्रगतीमध्येच आपलीही प्रगती अंतर्भूत असून, ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती – प्रधानमंत्री.

Our own progress lies in the progress of the country, and this sentiment is the greatest strength of Navbharata – Prime Minister.

देशाच्या प्रगतीमध्येच आपलीही प्रगती अंतर्भूत असून, ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती – प्रधानमंत्री.Prime Minister Narendra Modi's appeal to remove misconceptions about vaccination.

नवी दिल्ली: ‘आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’ (स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने) या उपक्रमाच्या राष्ट्रीय प्रारंभ सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीजभाषण केले. तसेच यावेळी ब्रह्मकुमारी समुदायाच्या सात कार्यक्रमांचाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला.  प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या “आझादी का अमृतमहोत्वव से स्वर्णीम भारत की ओर” या उपक्रमाच्या उदघाटन सोहळ्यात ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल, परषोत्तम रुपाला, कैलाश चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देश प्रगतीच्या मार्गावर नेणारे नवीन निर्णय घेत असून त्याद्वारे नवभारताच्या युगाचा साक्षीदार ठरत आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील देश आपल्या मूल्यांशी तडजोड करत नाही, हेच आपल्या देशाचं बलस्थान आहे असं त्यांनी सांगितलं. समाजासाठी विविध कामं करणारी प्रजापती ब्रह्मकुमारी संस्था आत्मनिर्भर भारतासाठी निश्चितच हातभार लावू शकते, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी यावेळी काढले.

नवभारताच्या अभिनव आणि प्रगतिशील अशा नवविचारांवर तसेच नव्या दृष्टिकोनावरही पंतप्रधानांनी मत व्यक्त केले. “आज आपण एक अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, जेथे भेदभावाला अजिबात वाव नाही. समानता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर भक्कमपणे आधारित अशा समाजाची उभारणी आपण करत आहोत.” असेही ते म्हणाले.

जनतेची आणि देशाची स्वप्न ही वेगळी नसून देशाच्या प्रगतीमध्येच आपली प्रगती अंतर्भूत आहे, आणि ही भावनाच नवभारताची सर्वात मोठी शक्ती बनत आहे,असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधानांनी प्रत्येकाला  आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली मूल्ये जिवंत ठेवण्याचे आणि आपले अध्यात्म आणि आपली विविधता जपण्याचे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचे  आवाहन केले. त्याचबरोबर तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य प्रणालींचे  सातत्याने आधुनिकीकरण करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

देशाच्या सर्वांगीण विकासाकरता सर्वांचं सहकार्य आणि प्रयत्न आवश्यक असून सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वांवर उभी असलेली भेदभावविरहित समाज व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे  असं प्रधानमंत्री म्हणाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *