गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर शिवसेना देणार पाठिंबा.

In Goa, Shiv Sena and NCP will contest elections together. If Utpal Parrikar contests independent elections, Shiv Sena will support him.

गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार, उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तर शिवसेना देणार पाठिंबा.

Goa Assembly Elections 2022
Image commons.wikimedia.org

गोवा विधानसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी घेतला आहे. गोव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्थानिक पक्षासोबत शिवसेना यांची एकत्र महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काँग्रेसला ३० जागा देण्याची तयारी दाखवली होती.

पण काँग्रेसनं हा प्रस्ताव मान्य केला नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ९ उमेदवारांची यादी त्यांनी आज जाहीर केली. उद्या आणखी काही जणांची उमेदवारी जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर शिवसेनेचा त्यांना पाठिंबा असेल. त्यासाठी शिवसेनेचा उमेदवार पणजीतून उमेदवारी मागे घेईल, अशी घोषणाही राऊत यांनी केली. सध्या पणजीतून शिवसेनेनं शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी दिली आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *