ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या पुरुषांच्या टीट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर.

Announcement of schedule for Men’s Twenty20 Cricket World Cup starting in Australia.

ऑस्ट्रेलियात सुरू होत असलेल्या पुरुषांच्या टीट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर.

Cricket Image
File Photo

ऑस्ट्रेलियात यावर्षी १६ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या पुरुषांच्या टीट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक काल आंतराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळानं जाहीर केलं.

पुरुषांच्या T20 क्रिकेटमधील सर्वोच्च जागतिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात प्रथमच होणार आहे. एकूण 16 आंतरराष्ट्रीय संघ 45 सामने खेळतील

यावर्षी अॅडलेड, ब्रिस्बेन, गिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी पुरुषांच्या टीट्वेंटी क्रिकेट विश्वचषक सामने खेळले जातील.

आयसीसी स्पर्धेची सुरुवात गतविजेते आणि यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

भारताचा समावेश दुसऱ्या गटात असून,भारत या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध 2022 च्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल.

दोन आशियाई संघांमधला हा आयकॉनिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील पहिला विश्वचषक सामना असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा विश्वचषक सामना 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात अॅडलेड ओव्हलवर खेळला गेला होता.

या वेळापत्रकानुसार १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत पात्रता फेरी, तर २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळात सुपर ट्वेल फेरीचे सामने दोन गटात होणार आहेत.

९ नोव्हेंबरला पहिला, तर १० नोव्हेंबरला दुसरा उपांत्य सामना होईल.

स्पर्धेचा विजेता १३ नोव्हेंबरला सिडनी इथं होणाऱ्या अंतिम सामन्यातून स्पष्ट होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *