Senior journalist and editor Dinkar Raikar passed away .
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं निधन.
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक दिनकर रायकर यांचं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दिनकर रायकर यांनी इंडियन एक्सप्रेसमधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली होती. वार्ताहर ते सहसंपादक असा प्रवास त्यांनी एक्सप्रेसमध्ये केला. त्यानंतर त्यांनी लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आणि नंतर समुह संपादक म्हणून पदभार सांभाळला. ते विधीमंडळ वार्तहर संघ आणि मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरित्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली .