Women’s FIFA World Cup qualifiers begin in Maharashtra.
महिलांच्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेऱ्यांना महाराष्ट्रात आरंभ.
मुंबई: महिलांच्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेऱ्यांना कालपासून राज्यात प्रारंभ झाला. मुंबई इथल्या फुटबॉल मैदानावर चायनिज तैपेई आणि चीन यांच्यात सलामीची लढत पार पडली.
चीनने चायनिज तैपेई संघावर ४-० अशा गोलच्या फरकाने मात करत उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेतील पहिलाच सामना अशा दोन संघांमध्ये झाला ज्यांनी मिळून आतापर्यंत ११ वेळा ही स्पर्धा जिंकली. मात्र, चीनने पहिल्या दहा मिनिटांमध्येच सामन्याचा निकाल स्पष्ट करत आपलं वर्चस्व राखलं.
आता चीन रविवारी आपल्या पुढील सामन्यात इराणविरुद्ध खेळेल. तसेच, तैपई संघ स्पधेर्तील आव्हान कायम राखण्याच्या निधार्राने नवी मुंबईत यजमान भारताच्या आव्हानाला सामोरा जाईल.
अ गटात प्रथमच ही स्पर्धा खेळणारा इस्लामिक रिपब्लिक इराण आणि यजमान भारत यांच्यातील सलामीचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. भारतीय महिलांना गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या होत्या.
पण, इराणनं भक्कम बचाव करून यजमानांना गोलपासून दूर ठेवलं. दोन्ही संघांनी सामना बरोबरीत सोडविण्याच्या दृष्टिने सावध खेळ केला. भारतीय संघाचा सामना आता रविवारी चायनीज तैपेई संघासोबत तर इराणचा सामना आठ वेळच्या विजेत्या चीनसोबत होईल.