मौखिक कर्करोगाला कारणीभूत ११४ जनुकीय प्रकारांचा बेंगलुरु-स्थित संस्थेद्वारे शोध

A Bengaluru-based institute has identified 114 genetic variants that cause oral cancer.

मौखिक कर्करोगाला कारणीभूत ११४ जनुकीय प्रकारांचा बेंगलुरु-स्थित संस्थेद्वारे शोध.

बंगळूरू: बंगळूरूमधील जैव माहिती तंत्रज्ञान आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान शासकीय संस्थेनं खाजगी क्षेत्रातील एचसीजी कॅन्सर सेंटरच्या सहकार्यानं केलेल्या अभ्यासात मानवांमधील मौखिक  कर्करोगाला कारणीभूत ११४ जनुकीय रूपं ओळखल्याचा दावा केला आहे.

९० टक्‍क्‍यांहून अधिक अचूकतेनं मौखिक कर्करोगाच्या रुग्णांच्‍या जगण्‍याचा अंदाज लावू शकतील असे मुख्य जनुकीय गुणधर्म देखील या अभ्यासात आढळून आले आहेत.  विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर सी एन अश्वथ नारायण यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त काल बेंगळुरू इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले की हे पथदर्शी संशोधन बंगळुरू इथल्या जैव माहिती तंत्रज्ञान आणि उपयोजित जैवतंत्रज्ञान संस्थेतील अत्याधुनिक जीनोमिक्स सुविधा वापरून केलं गेलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *