क्षेपणास्त्रासह शस्‍त्रास्त्र साठवण्‍यासाठी असलेली होडी (एमसीए) बार्ज तैनात

Missile Ammunition Storage essel (MCA) barge with missile, LSAM 10 (78 yards) deployed क्षेपणास्त्रासह शस्‍त्रास्त्र साठवण्‍यासाठी असलेली होडी (एमसीए) बार्ज, एलएसएएम 10 (यार्ड 78) तैनात हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

A missile storage vessel (MCA) barge deployed

क्षेपणास्त्रासह शस्‍त्रास्त्र साठवण्‍यासाठी असलेली होडी (एमसीए) बार्ज, एलएसएएम 10 (यार्ड 78) तैनात

08 x क्षेपणास्त्रासह दारुगोळा साठवणाऱ्या (एमसीए) बार्ज प्रकल्पातील चौथी बार्ज तैनात

मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड, येथे नाद (कारंजा) साठी झाली तैनातMissile Ammunition Storage essel (MCA) barge with missile, LSAM 10 (78 yards) deployed
क्षेपणास्त्रासह शस्‍त्रास्त्र साठवण्‍यासाठी असलेली होडी (एमसीए) बार्ज, एलएसएएम 10 (यार्ड 78) तैनात
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

नवी दिल्ली : विशाखापट्टनम येथील एमएसएमई शिपयार्ड, मेसर्स सेकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतीय नौदलासाठी बांधलेल्या क्षेपणास्त्रासह दारुगोळा साठवण्‍यासाठी असलेली होडी – बार्ज, एलएसएएम 10 या 08 x क्षेपणास्त्रासह दारुगोळा साठवणाऱ्या बार्ज प्रकल्पाच्या चौथ्या बार्जचा आज 28 डिसेंबर 23 रोजी मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड येथे एन. ए. डी. (कारंजा) साठी समावेश करण्यात आला. प्रवेश समारंभाच्या अध्यक्षस्थानी सी. ओ. वाय. (एम. बी. आय.) चे कमांडर एम. व्ही. राज कृष्णा होते.

संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स सेकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम यांच्यात 19 फेब्रुवारी 2021 रोजी 08x क्षेपणास्त्रासह दारुगोळा साठवणाऱ्या बार्ज बांधणी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या बार्जच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या जहाजांना जेट्टी आणि बाह्य बंदरांवर वस्तू/दारूगोळा पाठवणे आणि उतरवणे सुलभ होईल. भारतीय नौदलाच्या परिचालन वचनबद्धतेला चालना मिळेल.

भारतीय नौवहन नोंदणीच्या (आय. आर. एस.) संबंधित नौदल नियम आणि नियमनानुसार या बार्जची रचना आणि बांधणी स्वदेशी पद्धतीने करण्यात आली आहे. नौवहन विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा (एन. एस. टी. एल.), विशाखापट्टणम येथे संरचना टप्प्यादरम्यान बार्जची नमुना चाचणी घेण्यात आली. ही बार्ज भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवास्पद ध्वजवाहक आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य बॅंकेने प्रशिक्षण केंद्र सुरु करावे
Spread the love

One Comment on “क्षेपणास्त्रासह शस्‍त्रास्त्र साठवण्‍यासाठी असलेली होडी (एमसीए) बार्ज तैनात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *