तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु

Social Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

A separate helpline cell has been opened in the office of the Assistant Commissioner of Social Welfare for transgenders

तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरुSocial Justice & Special Assistance Maharashtra Government सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

पुणे : तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध सेवा व सुविधेबाबत माहिती देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स.नं. १०४/१०५, विश्रातवाडी येथे स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु करण्यात आला आहे.

जिल्हास्तरावरच तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारीचे निवारण करणे, यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीयपंथीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतनयोजना, तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदानकार्ड व आधारकार्ड काढण्यासाठी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे, शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाबांबत माहिती देण्यासाठी हा कक्ष सुरु करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या कक्षाशी प्रत्यक्ष अथवा ०२०-२९७०६६११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
बचत गटांतील सदस्यांच्या सक्षमीकरणासाठी तेजस्विनी फूड्स व तेजस्विनी कलादान उपयुक्त
Spread the love

One Comment on “तृतीयपंथीयांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष सुरु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *