Due to improved subsidy of fertilizers, A significant drop in the selling price of phosphorus fertilizers.
The Central Government has announced a revised value-based grant on 22nd May 2021. The increase in the subsidy for phosphorus has led to a sharp decline in the price of phosphorus fertilizers. Farmers are urged to purchase fertilizers at reduced prices due to improved fertilizer subsidies.
If fertilizer is being sold at the price prior to the announcement of the revised grant, can inform the Commissioners level control room mobile number 8446117500 and toll-free No.1800 233 4000 daily from 10.00 am to 6.00 pm. Also, you should lodge a complaint with your district control room, taluka agriculture officer, agriculture officer (panchayat committee), and appeal to the commissioner (agriculture), Shri Dheeraj Kumar.
खतांच्या सुधारित अनुदानामुळे, स्फुरदयुक्त खतांच्या विक्री किंमतीत मोठया प्रमाणात घट.
केंद्र शासनाने दि.22 मे 2021 रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. या मध्ये स्फुरद या अन्नद्रव्यांचे अनुदान वाढवण्यात आल्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यानी कमी झालेल्या किंमतीमध्ये खतांची खरेदी करावी असे आवाहन केले आहे.
सुधारित अनुदान जाहिर होण्याच्या पूर्वीच्या किंमतीत खत विक्री होत असल्यास, आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षामधील भ्रमणध्वनी क्र.८४४६११७५०० व टोल फ्री क्र.१८०० २३३ ४००० या क्रमांकावर दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संपर्क साधावा. तसेच आपल्या जिल्हयाचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त (कृषि), श्री धीरजकुमार यांनी केले आहे..