A state-of-the-art bus stand will be set up at Shivajinagar.

A state-of-the-art bus stand will be set up at Shivajinagar.

 As Shivajinagar is the main congested place in Pune city, the ST bus stands to be set up here will be constructed in a state-of-the-art manner, State Transport Minister Anil Parab said today. He further said that priority would be given to the construction of a bus stand in the shortest possible time in the future by speeding up the work of the metro project. The purpose of this visit was to see the current status of the project work and to plan the construction of a bus stand accordingly. 

Adv.Anil Parab
Transport Minister Adv. Anil Parab inspected the bus stand at Wakdewadi

However, Transport Minister Adv. Anil Parab today inspected the Metro work on the site of  State Transport Corporation at Shivaji Nagar. Vice President and Managing Director Shekhar Channe,  State Transport.T. Corporation Architect and General Manager (Construction) Bhushan Desai, Additional Chief Engineer of Metro Rajesh Jain, officers and staff of the concerned department were present.

While inspecting the Metro work on the ST site at Shivajinagar, the concerned Metro project officials said that the Pune Metro is working hard to complete the ongoing work by July 2022. After that, an updated bus stand will be set up on the site of ST Corporation at Shivaji Nagar.

 Transport Minister Adv. Anil Parab inspected the bus stand of State Transport Corporation at Wakdewadi. Passengers should not be inconvenienced. Arrangements should be made to provide clean water to the passengers, clean the bus stand and buses. Passengers, officers and staff will use masks and sanitisers, Transport Minister Adv. Given by Parab. He also inspected Lalpari, Shivshahi and Nimaram buses.  Transport Minister Adv. Depot head Anil Bhise informed Parab about the facilities at the bus stand.  

शिवाजीनगर येथे होणार अत्याधुनिक बसस्थानक . 

 शिवाजीनगर हे पुणे शहरातील मुख्य गर्दीचे  ठिकाण असल्याने , येथे उभारण्यात येणारे एसटीचे बसस्थानक अत्याधुनिक पध्दतीने निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री अँड अनिल परब यांनी आज केले. ते पुढे म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देऊन भविष्यात कमीत कमी वेळात बसस्थानकाची उभारणी करण्याला प्राधान्य देण्यात येईल. या साठी प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती पहाणे, त्या अनुषंगाने बसस्थानकाची उभारणीचे नियोजन करणे, हे या प्रत्यक्ष भेटीचे प्रयोजन होते. 

Adv.Anil Parab
परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी वाकडेवाडी येथील बसस्थानकाची केली पाहणी

तथापि,आज परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी आज शिवाजी नगर येथील रा.प.महामंडळाच्या जागेवरील मेट्रो कामकाजाची पाहणी केली. यावेळी  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने,रा.प. महामंडळ वास्तुविशारद व महाव्यवस्थापक (बांधकाम) भूषण देसाई, मेट्रोचे अतिरिक्त मुख्य अभियंता राजेश जैन यांच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.  

शिवाजीनगर येथील एसटीच्या जागेवरील मेट्रोच्या कामाची पाहणी करीत असतांना संबंधित मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे मेट्रोच्यावतीने सध्या सुरू असलेले काम जुलै-२०२२ पर्यंत  पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानंतर  एसटी महामंडळाच्या शिवाजी नगर येथील जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारेल,.

परिवहनमंत्री ॲड. परब यांनी सांगितले.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाकडेवाडी येथील बसस्थानकाची पाहणी केली. प्रवाश्यांची गैरसोय होता कामा नये. प्रवाश्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी, बसस्थानक व बसेसमध्ये स्वच्छता राखावी. प्रवाशी, अधिकारी व कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतील, याबाबत दक्षता घेण्याची सूचना परिवहन मंत्री ॲड. परब यांनी दिल्या. त्याच बरोबर लालपरी, शिवशाही, निमआराम बसेसची पाहणी केली.  परिवहनमंत्री ॲड. परब यांना आगार प्रमुख अनिल भिसे यांनी बसस्थानकवरील सोई-सुविधा बाबत माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *