स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई शहराचा अनोखा उपक्रम

A unique initiative of Navi Mumbai City on the occasion of 'Swachhta Pandhrvada, स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई शहराचा अनोखा उपक्रम हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

A unique initiative of Navi Mumbai City on the occasion of ‘Swachhta Pandhrvada,

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई शहराचा अनोखा उपक्रम

नवी मुंबई : संपूर्ण आणि सर्वत्र स्वच्छता या उदात्त हेतूने,संपूर्ण देशात, एकच उत्साह संचारलेला आहे याचे कारण स्वच्छता ही सेवा 2023 अंतर्गत येणाऱ्या स्वच्छताA unique initiative of Navi Mumbai City on the occasion of 'Swachhta Pandhrvada,
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई शहराचा अनोखा उपक्रम
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News पंधरवड्या निमित्त देशातले नागरिक आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, मेट्रो स्टेशन, रेल्वे रूळ, आसपासच्या टेकड्या, समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळे, कचराकुंड्या स्वच्छ करण्यासाठी एकत्र आले आहेत.एका बाजूला देशातले क्रीडाप्रेमी क्रिकेट विश्वचषक आणि इंडियन सुपर लीग (ISL) यासह खेळाच्या इतर स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत असताना, स्वच्छता उत्साही मात्र याआधीच त्यांच्या स्वत:च्या आयएसएल (ISL) अर्थात भारतीय स्वच्छता लीग 2.0 मध्ये सहभागी झाले आहेत.

नवी मुंबईत या कार्यात मोठा लोकसहभाग पाहायला मिळत असून यात सफाईमित्र, नागरिक, तरुण, शालेय विद्यार्थी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेचे अधिकारी, प्रसिद्ध व्यक्ती, पुरुष आणि स्त्रिया यांचा मोठ्या प्रमाणावर, सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या शहराने सर्वसमावेशक स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या नाविन्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांचे सुंदर मिश्रण सादर केले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबईने महापालिकेने विविध उपक्रम आणि मोहिमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आणि एकत्रीकरण पाहिले आहे. पण यावेळी शहरासाठी जे अनोखे होते ते म्हणजे ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) समुदायातील लोकांचा उत्स्फूर्त सहभाग.

या समुदायातील लोकांनी समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून स्वतःवर स्वच्छतेची जबाबदारी घेतली आणि संपूर्ण स्वच्छता ही सेवा मोहिमेबद्दल विशेषतः स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टाबद्दल आणि सर्वसाधारणपणे तिथे स्वच्छतेची खरी गरज आहे त्या ठिकाणी स्वच्छते विषयी जागरूकता पसरवण्याचे काम केले.

भारतीय स्वच्छता लीग 2.0 दरम्यान शहरातील 250 हून अधिक ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) व्यक्तींनी वाशी वॉर्ड मधल्या छोट्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तिथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये नवी मुंबईतील तृतीयपंथीयांनी शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर “सफाई दो मत – सफाई करो” अर्थात “कारणे देऊ नका- स्वच्छता करा” हा संदेश दिला. या अभियानाच्या निमित्ताने शहर कचरामुक्त करण्यासाठी तक्रार न करता स्वच्छतेसाठी कृती करण्याची गरज अधोरेखित झाली. साडी नेसलेले, पांढऱ्या टोप्या घातलेले आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या घटकांनी म्हणजेच कचऱ्याचे दोन डबे, मोहिमेत सहभागी इतर कार्यकर्ते आणि मोहिमेचे फलक यांसारख्या घटकांनी चोहोबाजूंनी वेढलेल्या या समुदायाने या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष वेधून घेतले. कचरा विलगीकरणाला चालना देण्याच्या या समुदायाच्या अनोख्या उपक्रमाचे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी भरभरून कौतुक केले.

या अभिनव मोहिमेद्वारे, ट्रान्सजेंडर समुदायाने सर्वसमावेशक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आणि ते या बदलाचे पायिक ठरले. भारताला कचरामुक्त करण्यासाठी या समुदायाने लहानात लहान योगदान देण्यास प्रवृत्त होण्यासाठी प्रत्येका समोर एक उदाहरण ठेवले आहे, कारण प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात देव आनंद शताब्दी सोहळ्याचे आयोजन 
Spread the love

One Comment on “स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई शहराचा अनोखा उपक्रम”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *