A workshop on research methodology was concluded at Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन पद्धतीवरील कार्यशाळा संपन्न
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाद्वारे ‘संशोधन पद्धती’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर आकाशकर उपस्थित होते. यावेळी सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाचे प्रमुख डॉ. कमलकुमार जैन, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील डॉ. अमृता नातू, डॉ. राजश्री मोहाडीकर आदी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात संस्कृत प्राकृत भाषा विभागातील डॉ. मुग्धा गाडगीळ आणि प्रो. डॉ. अनघा जोशी यांनी ‘सामान्य संशोधन पद्धती’ या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. मुग्धा गाडगीळ यांनी संशोधन ह्या शब्दाची व्युत्पत्ती,त्याचा अर्थ आणि शोधनासाठी वापरण्यात येणार्या ग्रंथाची सूची या सर्वांचा आढावा घेतला.
तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत विविध विषयातील तज्ञांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. डॉ. राजश्री मोहाडीकर यांनी ‘प्राकृत विषयातील संशोधन पद्धती’, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील डॉ. अमृता नातू यांनी जापनिज ‘ईकिगाई’ पद्धतीवर, समाजशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. श्रुती तांबे यांनी ‘व्यावहारीक दृष्टीने पुरुषार्थ करायला हवा’, श्री. अमितकुमार उपाध्ये यांनी ‘हस्तलिखित एवं पाण्डुलिपी’, डॉ. प्रदीप गोखले यांनी ‘भारतीय संशोधन पद्धती’, डॉ. प्राजक्ता धर्मराव कोळेकर यांनी ‘शोधपत्राचे शीर्षक व संदर्भ’, प्राध्यापक डॉ. देवकुमार अहिरे यांनी ‘इतिहास विषयातील संशोधन’, प्राध्यापक डॉ. मोहित टंडन यांनी ‘पाश्चात्य संशोधन तत्त्वज्ञान पद्धती’, प्राकृत भाषेचे विद्वान डॉ. अशोक सिंग यांनी ‘प्राकृत व्याकरण-भारतीय व्याकरण संशोधन पद्धती’ तसेच श्री. आशिष सांगळे यांनी ‘पाश्चात्य संशोधन पद्धती’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी जैन अध्यासनाला मदत म्हणून देणगी दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधन पद्धतीवरील कार्यशाळा संपन्न”