Abasaheb Magar passed away.
A great contribution to the economic, social, and educational field of Pune.
Abasaheb alias Dattatreya Dhondu Magar, a prominent personality from Hadapsar, passed away at the age of 91 on Wednesday. He succumbed to his disease while undergoing treatment at Noble Hospital Hadapsar. He has been undergoing treatment for the past few days. He made great contributions in the economic, social, and educational spheres of the Pune metropolis. Born on June 5, 1931, Abasaheb Magar graduated from the College of Engineering, Pune in 1956 with a degree in Civil Engineering.
Aabasaheb Magar was the Founding Director of Magarpatta City Group, Director of Annasaheb Magar College Management Board, and a life member of Maratha Shikshan Prasarak Mandal. He was the Director of Karad Urban Bank. He was also a staunch supporter of the Pune District Education Association. Abasaheb Magar was the father of Satish Magar, the Managing Director of Magarpatta Township, and the younger brother of the late MP Annasaheb Magar.
आबासाहेब मगर यांचे निधन.
पुण्याच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान.
हडपसर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आबासाहेब उर्फ दत्तात्रेय धोंडू मगर यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले ते 91 वर्षाचे होते. नोबेल हॉस्पिटल हडपसर येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुणे महानगरातील आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. 5 जून 1931 रोजी जन्मलेल्या आबासाहेब मगर यांनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे मधून 1956 चाली आपली स्थापत्य अभियांत्रिकी ची पदवी संपादन केली होती.
आबासाहेब मगर हे मगरपट्टा सिटी समूहाचे संस्थापक संचालक,अण्णासाहेब मगर महाविद्यालय व्यवस्थापन मंडळाचे संचालक, मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे ते आजीव सदस्य होते. कराड अर्बन बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती तसेच पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशनचे ते खंबीर पाठीराखे होते आबासाहेब मगर हे मगरपट्टा टाऊनशिप चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांचे वडील आणि स्वर्गीय खाजदार अण्णासाहेब मगर यांचे छोटे बंधू होत