Accepting applications from farmers for certified seed distribution, crop demonstrations, and seed Minikits started on the MahaDBT portal.
In the year 2021-22, under the National Food Security Mission – Cereals, Cereals, and Commercial Crops, applications are being invited from interested farmers for certified seed distribution, crop demonstrations, and seed Minikits during the Kharif season through the Mahadibt system. Farmers to register The deadline has been extended till May 20, 2021. Only farmers who register by May 20, 2021, will be considered.
Under the National Food Security Campaign- Food crops, oilseeds, and commercial crops program is implemented in the following districts.
Paddy – Nashik, Pune, Satara, Nagpur, Bhandara, Gondia, Chandrapur, Gadchiroli
• Cereals – All the districts in the state
• Coarse Grain – Nashik, Dhule, Jalgaon, Ahmednagar, Sangli, Aurangabad, Jalna
Nutritious Cereals – Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Solapur, Satara, Sangli, Kolhapur, Aurangabad, Jalna, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Parbhani, Hingoli, Buldhana, Akola, Washim, Amravati, Yavatmal, Wardha, Gondia, Chandrapur, Gadchiroli
ळीत Cereals – Nashik, Dhule, Ahmednagar, Pune, Sangli, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Parbhani, Hingoli, Buldhana, Akola, Washim, Amravati, Yavatmal, Wardha, Nagpur, Chandrapur
• Commercial Crops (Cotton) – Nagpur, Wardha, Chandrapur, Amravati, Yavatmal, Akola, Washim, Buldhana, Yavatmal, Aurangabad, Jalna, Beed, Parbhani, Nanded, Ahmednagar, Dhule Jalgaon
Seed Distribution –
For paddy seeds in the above-mentioned districts, Rs. 20 / – per kg, Rs. 10 / – per kg. For pulses seeds Rs. 50 / – per kg, Rs. 25 / – per kg. For hybrid maize and bajra seeds Rs. 100 / – per kg for sorghum and bajra straight variety seeds Rs. 30 / – per kg, Rs. 15 / – per kg. For soybean seed 10 to 15-year-old variety Rs. 12 / – per kg. Grants are payable up to 50% of the total cost. The benefit is payable to a farmer up to a limit of 2 hectares for the distribution of certified seeds.
Crop Demonstrations –
The subsidy will be provided to a farmer in the form of inputs within the limit of 1 acre for crop demonstration. For inputs like seeds, organic fertilizers, micronutrients, soil reformers, and crop protection drugs, the farmer is required to pay Rs. 2000 / – to 4000 / – per acre subsidy will be paid on a DBT basis. For this, district wise package is being prepared on the advice of scientists of agricultural universities and it is mandatory to use the entire package.
Seed Minikit-
Important Note: It is mandatory to intercrop Minikit pulses in soybean / millet / sorghum / cotton / maize.
In the following Districts, Seed Minikit is available.
• Tur – Aurangabad, Jalna, Beed, Latur, Osmanabad, Nanded, Parbhani, Hingoli, Buldhana, Akola, Washim, Amravati, Yavatmal, Wardha, Nagpur, Jalgaon, Nandurbar, Dhule, Sangli, Satara, Ahmednagar, Nashik, Solapur.
Mug – Jalgaon, Dhule, Ahmednagar, Jalna, Beed, Nanded, Parbhani, Hingoli, Buldhana, Akola, Amravati
Urad – Ahmednagar, Beed, Nanded, Osmanabad, Buldhana, Akola
The selected farmers will be given a Minikit of 4 kg seed of one of the crops of Tur, Mug, and Urad in Kharif season 2021. Tur – Rs. 412 / – per 4 kg Minikit, Mug – Rs. 407 / – per 4 kg minikit, urad – Rs. 349 / – per 4 kg Minikit and if the price of Seed Minikit is more than the subsidy, the farmers have to pay an extra amount.
Farmers will be selected through an online lottery. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या घटकासाठी शेतकऱ्याचे अर्ज घेण्यास सुरवात.
सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणाली द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी दि. २० मे, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. २० मे, २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके कार्यक्रम खालील नमूद जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.
- भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- कडधान्य -राज्यातील सर्व जिल्हे
- भरडधान्य (मका) – नाशिक, धुळे, जळगाव,अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना
- पौष्टिक तृणधान्य – ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नंदुरबार,जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर,सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली,बुलढाणा, अकोला ,वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
- गळीतधान्य – नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर
- व्यापारी पिके (कापूस)- नागपुर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, धुळे जळगाव
बियाणे वितरण –
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. २०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रती किलो. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. 5०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. २५/- प्रती किलो. संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. १००/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. ३०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १5/- प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षाचे वाणास रु.१२/- प्रती किलो. एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिक –
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकर च्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
बियाणे मिनिकीट-
महत्त्वाची सूचना – सोयाबीन/बाजरी/ज्वारी/कापूस/मका या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे.
बियाणे मिनिकीट साठी जिल्हे –
- तूर – औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, सोलापूर.
- मुग – जळगाव, धुळे, अहमदनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती
- उडीद – अहमदनगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला
निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४ किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. तूर – रु. ४१२/- प्रती ४ किलो मिनिकीट, मुग – रु. ४०७/- प्रती ४ किलो मिनिकीट, उडीद – रु. ३४९/- प्रती ४ किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावयाची आहे.
शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.