Action by Municipal Corporation on unauthorized construction
महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई
कोंढवा खुर्द , वडगाव बु. आणि घोरपडी येथील सुमारे ३३३६६.२६ चौ.फुट क्षेत्र मोकळे केले
पुणे : पुणे महानगरपालिका झोन क्र.२ मधील मौजे कोंढवा खुर्द स.नं.५१-५२, वडगाव बु. स.नं.४१ आणि झोन क्र.४ मधील घोरपडी स.नं.४९ व इतर येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येऊन एकूण सुमारे ३३३६६.२६ चौ.फुट क्षेत्र मोकळे करणेत आले.
कोंढवा खुर्द स.नं. ५१,५२ येथे कलम ५३ (१) अन्वये व वडगाव बु. स.नं.४१ येथे कलम ५३(१) (अ) व कलम ५४ अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.
सदरच्या कारवाईमध्ये कोंढवा खुर्द स.नं.५२ येथील मालक व इतर यांचे २४०० चौ. फुट, युसुफ शेख व इतर यांचे १८०० चौ. फुट, स.नं. ५१ मधील परवेझ व इतर यांचे १२०० चौ. फुट असे एकूण ५४०० चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.
शिवाय वडगाव बु. स.नं.४१ येथील केरबा चव्हाण व इतर यांचे एकूण १९७४६ चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.
घोरपडी स.नं.४९ येथील विनोद यादव व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट, रोहित कदम व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट, प्रिया सोमाणी व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट, A-1 Fateh Chickens सेंटर व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट, जय मल्हार व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट, अमीर चिकन व इतर यांचे ८०.७३ चौ. फुट इ.अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले आणि स.नं. ५४ मधील रघुनाथ दळवी व इतर यांचे ४५२०.८८ चौ. फुट, स.नं.५३ मधील श्रीकांत लक्ष्मीशेठ व इतर यांचे १६०० चौ. फुट, स.नं. ७३ मधील अंजली सुर्यकांत कवडे यांचे १६१५ चौ. फुट इ.अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात आली असून एकूण ८२२०.२६ चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.
सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई”