Mahawachan activities in Sadhana Vidyalaya
साधना विद्यालयात महावाचन उपक्रम
हडपसर : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करावे व प्रगल्भ व्हावे यासाठी साधना विद्यालयात महावाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्रदिप बागल यांचे संकल्पनेतून व उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील कलाशिक्षक कारभारी देवकर, भरत कोलते,महेंद्र रणवरे, रमेश महाडिक,मनोज भामरे, ज्ञानेश्वर सरोदे व ज्ञानेश्वर कोकाटे
यांच्या सहकार्याने महावाचन उपक्रमाचे आयोजन केले.
विद्यालयातील इयत्ता ८वी चे वर्गशिक्षक व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साधना विद्यालयात महावाचन उपक्रम”