दूरदर्शनवरच्या महाभारत मालिकेमध्ये ‘भीम’ हे पात्र रंगवणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचं निधन.

Actor Praveen Kumar, who played the character ‘Bhim’ in the Mahabharat series on Doordarshan, has passed away.

दूरदर्शनवरच्या महाभारत मालिकेमध्ये ‘भीम’ हे पात्र रंगवणारे अभिनेते प्रवीण कुमार यांचं निधन.

बीआर चोप्रा यांच्या प्रतिष्ठित दूरदर्शनवरच्या महाभारत मालिकेमध्ये ‘भीम’ हे पात्र रंगवणारे आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदकं पटकावणारे सीमा सुरक्षा दलाचे उप कमांडंट प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालं.Actor Praveen Kumar Sobati

ते 74 वर्षांचे होते. त्यांनी आशिया खेळांमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं, तसंच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या निधना बद्दल सीमा सुरक्षा दलानं आपल्या ट्वीटर संदेशात शोक व्यक्त केला आहे.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रवीण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. 

हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले. “त्याला छातीत जंतुसंसर्गाची तीव्र समस्या होती. रात्री, जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हा आम्ही डॉक्टरांना घरी बोलावले. रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले,” असे प्रवीण यांच्या नातेवाईकाने पीटीआयला सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन लहान भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, आज पंजाबी बाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डिस्कस थ्रोअर आणि हॅमर थ्रोअर म्हणून सुरुवात करून, प्रवीणयांनी ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ यांसारख्या व्यासपीठांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1966 आणि 1970 च्या आशियाई खेळांमध्ये डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक तसेच 1966 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. त्यांनी सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंट म्हणूनही काम केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *