Admin is not responsible for text posted by member on WhatsApp group – Kerala High Court
व्हॉट्स अप ग्रुपवर सदस्याने टाकलेल्या मजकुरासाठी एडमिन जबाबदार नाही -केरळ उच्च न्यायालय
केरळ: व्हॉट्स अप ग्रुपवर ग्रुपच्या कुठल्याही सदस्यानं टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरासाठी ग्रुपच्या एडमिनला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, असा निर्वाळा केरळच्या उच्च न्यायालयानं दिला.
माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या विरोधात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयानं हे सांगितलं.
या संदर्भात निर्णय देताना न्यायाधीश कौसर यांनी मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाचा हवाला दिला, ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तिला ग्रुपमध्ये समाविष्ट करणं किंवा ग्रुपमधुन काढणं एवढंच काम ग्रुप एडमिनचं असतं, या शिवाय ग्रुपवर त्याचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं.