Applications are invited by October 11 for admission to Shorthand Course
लघुलेखन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुलुंड, मुंबई यांच्याकडील स्टेनोग्राफी मराठी (लघुलेखन मराठी) या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थेमध्ये प्रवेश सत्र २०२३-२४ करीता स्टेनोग्राफी मराठी या अभ्यासक्रमाला ऑगस्ट २०२३ पासून प्रवेशाकरीता मान्यता मिळालेली आहे. त्या नुसार या व्यवसायाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून https://msbsvet.edu.in या संकेतस्थळावर ‘युजर मॅन्युअल फॉर कँडिडेट’ मध्ये ऑनलाईन पर्याय भरून तसेच १०० रुपये ऑनलाईन रक्कम भरुन अर्ज निश्चित करावा व त्यानंतर संस्था व व्यवसायाचा विकल्प भरण्यात यावा.
व्यवसायाची मुदत एक वर्ष असून प्रवेश क्षमता ३० आणि प्रवेश पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएसबीएसव्हीईटी मंडळाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अभ्यासक्रमामध्ये १०० शब्द प्रति मिनीट लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) आणि ३० शब्द प्रति मिनीट मराठी टंकलेखन हे विषय समाविष्ट आहेत, अशी माहिती संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “लघुलेखन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन”