Transparency is important in the age of information technology
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : संकेतस्थळाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना विभागाची सविस्तर माहिती उपलब्ध होत असून माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जलसंपदा विभागांतर्गत पाच महामंडळाकरिता नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळांचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात येथे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नागरिकांना विविध माहिती घरबसल्या उपलब्ध होण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे संकेतस्थळ, सध्या नागरिकांना माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून माहिती हवी असते. संबंधितांना संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्यानचे कळविल्यास त्यांचा वेळ आणि श्रमाची बचत होईल.
सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वाची माहिती वगळता सर्व अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी. संकेतस्थळांची देखभाल नियमित करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. विभागाचा विकासाचा वेग असाच वाढता ठेवण्यात यावा, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.
जलसंपदा प्रकल्प नियोजन हे नदी खोरे निहाय केले जात असल्याने राज्यातील जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५ पाटबंधारे विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळ कामाचा व्याप हा मोठा असल्याने प्रत्येक महामंडळ करत असलेल्या कामकाजाविषयी माहिती सामान्य नागरिकांपर्यंत होण्यासाठी स्वतंत्र संकेत स्थळ आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असल्याचे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पारदर्शकता महत्त्वाची”