Agricultural cess on crude palm oil ranges from 7.5 per cent to 5 per cent
कच्च्या पाम तेलाचे कृषी उपकर साडेसात टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर
नवी दिल्ली: ग्राहकांना आणखी दिलासा देण्यासाठी आणि देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ रोखण्यासाठी केंद्राने कच्च्या पाम तेलासाठी कृषी उपकर साडेसात टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला आहे.
गेल्या 12 फेब्रुवारीपासून हा उपकर कमी करण्यात आला आहे. कृषी उपकर कमी केल्यानंतर, कच्चे पाम तेल आणि शुद्ध पाम तेलाच्या आयात करातील फरक 8 पूर्णांक 25 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
यामुळे देशांतर्गत तेल शुद्धीकरण उद्योगाला कच्चे तेल आयात करण्यासाठी लाभ होईल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
खाद्यतेलाच्या किमतींचं मूल्यमापन करण्यासाठी सरकारने कच्च्या पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील सध्याचा मूलभूत आयात शुल्क दर शून्य टक्के येत्या 30 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवला आहे.