Air Force aircraft will also join Operation Ganga
ऑपरेशन गंगा मोहिमेत हवाई दलाची विमानंही सामील होणार
नवी दिल्ली : गंगा अभियानांतर्गत युक्रेन मधुन भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाची विमानं देखील आजपासून या अभियानात सामील होणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाला या संदर्भात सुचना केली होती.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भारतीयांना मायदेशी परत आणलं जाईल, असं भारतीय हवाई दलानं म्हटलं आहे.
या साठी हवाई दलाच्या सी-17 विमानांचा उपयोग केला जाणार आहे.