हवाई खेळांना प्रोत्साहन दिले जाणार.

Air sports like aerobatics, aeromodelling, amateur-built and experimental aircraft, ballooning, drones gliding, hang gliding are to be promoted under NASP.

एनएएसपी अंतर्गत एरोबॅटिक्स, एअरो मॉडेलिंग, अमॅच्युअर -बिल्ट अँड एक्सपरिमेंटल एअरक्राफ्ट, बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग, हँग ग्लायडिंग यासारख्या हवाई खेळांना प्रोत्साहन दिले जाणार.

Balloons Hot Air
Image by PIXABAY.COM

नवी दिल्ली: देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण (NASP 2022) मसुदा तयार केला आहे. जनतेच्या सूचना जाणून घेण्यासाठी हे मसुदा धोरण 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध

करण्यात आले असून सूचना आणि प्रतिसाद सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 होती. सरकार प्राप्त सूचना  तपासत आहे.

एनएएसपी 2022 च्या मसुद्यानुसार, भारताला हवाई खेळांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी सुचवलेल्या  उपाययोजना पुढीलप्रमाणे  आहेत:

i.धोरणात एरोबॅटिक्स, एअरो मॉडेलिंग, अमॅच्युअर -बिल्ट अँड एक्सपरिमेंटल एअरक्राफ्ट , बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग, हँग ग्लायडिंग आणि पॅराग्लायडिंग मायक्रो-लाइटिंग आणि पॅरा-मोटरिंग स्कायडायव्हिंग आणि विंटेज विमाने यासारख्या बहुतांश हवाई खेळांचा समावेश असेल.

ii.हवाई क्रीडाप्रकारातील  तज्ञांना सहभागी करून  सरकार एक साधी, हितधारक -स्नेही  आणि प्रभावी शासन व्यवस्था  विकसित करू शकते.

iii.आत्मनिर्भर भारत अभियानाच्या धर्तीवर , हवाई क्रीडा उपकरणांची देशी संरचना , विकास आणि निर्मितीला चालना दिली जाईल.

iv.जागतिक हवाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार.

v.शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना त्यांच्या अभ्यासक्रमात हवाई खेळांचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार.

देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 2021-22 या वर्षासाठी  एक कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण 2022 ला अंतिम स्वरूप दिल्यानंतर  आणि प्रस्तावित भारतीय हवाई क्रीडा महासंघाची  (ASFI) स्थापना झाल्यानंतर, सरकार गरजेनुसार निधी जारी करू शकते.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे  राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (सेवानिवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *