राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

Minister Mangalprabhat Lodha मंत्री मंगलप्रभात लोढा हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Organized ‘PM Skill Run’ on 17th September in all ITIs of the state

राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन

रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

मुंबई : राज्यातील युवक -युवतींमध्ये कौशल्य विकासाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाद्वारे (आयटीआय) ‘पीएम स्कील रन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच नागपूर विभागात रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी ‘इंडस्ट्री मीट’ व ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात Government Industrial Training Institute. Department of Technical Education औद्योगिक प्रशिक्षण संस्था हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar Newsआले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधता येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कौशल्य विकास विभाग कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सर्व शासकीय व खासगी आयटीआयचे बळकटीकरण करून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत नागपूर येथे दुपारी २ वाजता इंडस्ट्री मिट होणार असून हा कार्यक्रम गुरूनानक भवन, अंबाझरी वळणमार्ग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ समोर अमरावती रोड,नागपूर ३३ येथे होणार आहे.

आयटीआयच्या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
सैन्यदलातील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या निवड चाचणीसाठी २५ सप्टेंबरला मुलाखत
Spread the love

One Comment on “राज्यातील सर्व आयटीआयमध्ये १७ सप्टेंबरला ‘पीएम स्कील रन’चे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *