On the occasion of Amrit Mahotsav of the university, five eminent alumni will be felicitated
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने नामवंत पाच माजी विद्यार्थ्याचा सत्कार
विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने वर्षभर ७५ नामवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने नामवंत पाच माजी विद्यार्थ्याचा सत्कार केंद्रीय मंत्री. नामदार धर्मेद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवार दिनांक ७ ॲाक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अमृत मोहोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॅा राजेद्र विखे पाटील यांनी आज दिली
पुढे बोलतांना राजेद्र विखे पाटील यांनी अमृत मोहोत्सव समिती पुढील वर्ष भर विविध कार्यक्रम राबवणार आहे. याअंतर्गत विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने वर्षभर ७५ नामवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येणार आहे यापैकी पाच नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सन्मान ना.धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार असुन यात ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॅा .शा.म. मुजुमदार , जेष्ठ शल्यचिकीत्सक डॅा के.एच . संचेती, प्रसिद्ध. कथ्थक नृत्यांगना शमा भाटे , जेष्ठ उद्योजक डॅा प्रमोद चौधरी , मराठीतील प्रसिद्ध लेखीका डॅा अरुणा ढेरे या मान्यवराचा समावेश आहे.
याकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील , विद्यापीठाचे कुलगुरु डॅा सुरेश गोसावी प्रकुलगुरु डॅा पराग काळकर , माजी विद्यार्थी संघाचे डॅा राजेश पांडे , तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य , विद्यापरीषद सदस्य, अधिसभा सदस्य , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात दुपारी २ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॅा विखे पाटील यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com