An agitation against the notice issued to Devendra Fadnavis in the phone tapping case
फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटिशीविरोधात आंदोलन
फोन टॅपिंग प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटिशीविरोधात भाजपानं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं.
नवी मुंबईतवाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येवून महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाचं नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलं.
नंदुरबारमध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज याप्रश्नी आंदोलन केलं. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या कृतीचा निषेध केला.