बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा.

An integrated development plan should be implemented for the development of tourist places in Buldana district – Governor Bhagat Singh Koshyari.

बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, लोणार, शेगाव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे असून लगतच्या जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ अशा पर्यटनस्थळांची जोड देऊन एक परिपूर्ण पर्यटन सर्कीट विकसित होऊGovernor Bhagat Singh Koshyari. शकते. त्यामुळे या सर्व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी एकात्मिक विकास आराखडा राबवावा, असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज दिले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज लोणार सरोवर आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, वन कायद्याचे पालन करतानाच पर्यटनाचाही विकास होणे महत्त्वाचे आहे. लोणार येथे निसर्ग, अध्यात्म तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनातून भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

लोणार सरोवरास दररोज दोन हजाराहून अधिक पर्यटक भेटी देतात. पर्यटकांची स्वच्छतेला पहिली पसंती असल्यामुळे त्यांच्यासाठी पुरेशी स्वच्छतागृहे असावीत यासाठीही प्रयत्न करावेत.

लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. या सरोवराचा विकास हा इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने व्हावा. तसेच याठिकाणी वैविध्यपूर्ण दुर्मिळ वनस्पती असून त्यांचे जतन व संवर्धन करण्यात यावे. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, शेगांव अशी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे आहेत. तसेच जवळच वेरुळ, अजिंठा सारखी ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. या साऱ्यांच्या एकात्मिक पर्यटन विकासास मोठा वाव असल्याने त्यादृष्टीने व्यापक आणि सर्वसमावेशक प्रयत्न व्हावेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *