An online webinar on Skill Development and Entrepreneurship Development Organized by Barti, Pune.
To train new entrepreneurs in Maharashtra, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute, (BARTI) Pune organized an online webinar on Skill Development and Entrepreneurship Development as per the instructions given by the Government of Maharashtra during the Covid-19 epidemic. The webinar will be held from 18/05/2021 to 20/05/2021. On 18th May 2021, Mr. Vidyadhar Gaikwad (Assistant Commissioner, GST, Mumbai), will give the lecture on “GST and its importance”. On May 19, 2021, Shri. Chakradhar Dodke (Director, Master Stroke Plus, Nagpur, Mentor, BEDC, Member Bombay Productivity Council and former Assistant Director, Ministry of Government of India, MSME) will deliver the lecture on“What is a Business Incubator, its Objectives, Functions, and Basic Mechanics of Starting Incubator Center. On May 20, 2021 lecture, on the subject of “Entrepreneurship Development and Government Scheme” by Shri. Ganesh Khamgal (Director, Mitcon, Pune) will deliver the lecture.
The event is organized by Zoom Meeting and the ID to attend the event. Use: 87241633771 and password: 1234. The event can also be viewed live on Barty’s Facebook page, linked to https://www.facebook.com/BARTIConnect. The show will also be rebroadcast on YouTube on the same day on Barti’s Online Channel at 6.30 pm. Director General of BARTI, Shri. Dhammajyoti Gajbhiye appealed to new entrepreneurs from Maharashtra and young people who want to start an industry should take advantage of this program.
कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे बार्टी पुणे मार्फत आयोजन.
महाराष्ट्रातील नवउद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे मार्फत कोव्हीड-19 या महामारीच्या काळात महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या निर्देशांनुसार कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. 18/05/2021 ते 20/05/2021 या काळात आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 18 मे 2021 रोजी “GST आणि त्याचे महत्त्व” या विषयावर श्री. विद्याधर गायकवाड. (असिस्टन्टकमिशनर, GST,मुंबई), हे व्याख्यान देणार आहेत. तसेच दिनांक 19 मे 2021 रोजी “Business Incubator म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, कार्ये, व Basic Mechanics of Starting Incubator Center. या विषयावर श्री. चक्रधर दोडके (संचालक,मास्टर स्ट्रोक प्लस,नागपूर, Mentor, BEDC, सदस्य Bombay Productivity Council व माजी सहा.संचालक भारत सरकार Ministry of MSME), हे व्याख्यान देतील व दिनांक 20 मे 2021 रोजी “उद्योजकता विकास व शासकीय योजना” या विषयावर श्री. गणेश खामगळ. (संचालक, मिटकोंन,पुणे) हे व्याख्यान देणार आहे,
सदर कार्यक्रम झूम मिटिंग द्वारे आयोजित करण्यात आला आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आय.डी. : ८७२४१६३३७७१ व पासवर्ड : १२३४ चा वापर करावा. तसेच सदर कार्यक्रम बार्टीच्या फेसबुक पेजवर लाईव्ह (LIVE) वरून सुद्धा सहभागी होता येईल, त्याची लिंक https://www.facebook.com/BARTIConnect आहे. तसेच या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण त्याच दिवशी युट्युब द्वारे बार्टीच्या ऑनलाईन (Barti Online Channel) चॅनेलवरून सायंकाळी 6.30 वाजता प्रसारित करण्यात येईल. तरी महाराष्ट्रातील नव उद्योजकांना तथा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी, संस्थेचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे